|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 80 टक्के दुचाकीस्वार वापरु लागले हेल्मेट

80 टक्के दुचाकीस्वार वापरु लागले हेल्मेट 

प्रतिनिधी/ बेळगाव

हेल्मेट वापरा असा आदेश आला की कपाळाला आठय़ा पाडून कशाला ती वाढीव डोकेदुखी असे म्हणणारे बेळगावकर एक-दीड वर्षात चांगलेच सुधारले आहेत. कडक उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही एकूण दुचाकी स्वारांपैकी 80 टक्के जण हेल्मेटचा वापर करु लागले आहेत. रहदारी पोलिसांनी दंडात्मक कारवाईच्या बाबतीत ठेवलेले सातत्य याला कारणीभूत आहे. याचबरोबरीने स्वतःच्या जीवाची काळजी या कारणासाठीही बरेच जण मोटार सायकलवर स्वार होताना डोकेदुखी म्हणून नव्हे तर गरज म्हणून हेल्मेट परिधान करु लागले आहेत.

पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. हेल्मेट सक्तीचा आदेश आला की 3 ते 4 दिवस हेल्मेट वापरुन पुन्हा तपासणी बंद झाली की उघडय़ा डोक्मयांनी गाडी चालविणे सुरु व्हायचे. पुन्हा चौकाचौकात पोलीस थांबू लागले की लोक हेल्मेट बाहेर काढायचे. पोलिसांनी रोज तपासणी सुरु ठेवावी. अधूनमधून तपासणी थांबली की आम्हाला कळत नाही. अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळायच्या. थोडक्मयात स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नव्हे तर पोलीस कारवाई करतात म्हणून मनात नसताना हेल्मेट वापरण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

सध्या मात्र सातत्याने कारवाई सुरु झाल्यामुळे हेल्मेटची सवय मोटार सायकल स्वारांना होवून गेली आहे. विशेषतः महिला वर्गात आणि केसांची स्टाईल करणाऱया तरुण वर्गातही हेल्मेट वापराचे प्रमाण वाढलेले आहे.

शहरातील सिग्नलवर थांबणाऱया मोटार सायकलचा आढावा घेतला असता एकावेळी 10 जण थांबलेले असल्यास यापैकी किमान आठ जणांच्या डोकीवर हेल्मेट दिसू लागले आहे. सकाळी 9 पूर्वी आणि रात्री 9 नंतर मात्र हेल्मेट न घालता वाहने चालविणाऱयांची संख्या जास्त आहे. मात्र पोलिसांनीही 10 नंतरच कारवाईस प्रारंभ करुन ही सवलत देवून टाकली आहे. किमान सकाळी व रात्री काही काळ दंडात्मक कारवाई होत नसल्याने मिळणारे थोडे स्वातंत्र्य वगळता इतर काळात मात्र मोटार सायकल स्टार्ट करण्यापूर्वी डोकीवर हेल्मेट आहे की नाही, याची खबरदारी प्रत्येकजण काळजीपूर्वकरित्या घेवू लागला आहे.