|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आठवडाभर होणार आर्थिक व्यवहारांवर परिणाम

आठवडाभर होणार आर्थिक व्यवहारांवर परिणाम 

प्रतिनिधी/ बेळगाव

आठवडय़ाभरावर आलेली निवडणूक, बँक अधिकारी व कर्मचाऱयावर पडलेला  निवडणुकीच्या कामांचा वाढीव बोजा आणि त्यातच अधूनमधून आलेल्या सुट्टय़ा याचा फटका आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. बहुतांश बँकांनी कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगून तसे फलक लावले आहेत. आठवडाभर ही परिस्थिती राहण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

मंगळवार दि. 16 पासूनच अनेक बँकांनी शटर बंद करुन असे फलक झळकवल्याने नागरिकांना परत फिरावे लागले. मंगळवार दि. 23 रोजी निवडणुका आहेत. यामुळे सर्व सुरळीत होण्यास बुधवार दि. 24 उजाडणार, अशी शक्मयता आहे. बँकांच्या कर्मचाऱयांना लावलेल्या निवडणूक कामांमुळे नागरिकांना आठवडाभर आपले आर्थिक व्यवहार स्थगित करण्याची वेळ आली आहे.

बुधवार दि. 17 रोजी महावीर जयंती आहे. त्यानंतर गुरुवार दि. 18 हा एक दिवस बँका सुरु राहणार आहेत. पुन्हा शुक्रवार दि. 19 रोजी गुडफ्रायडेची सुट्टी आहे. शनिवारी दि. 20 रोजी बँका सुरु राहतील. पुन्हा रविवार दि. 21 ही साप्ताहिक सुट्टी असून सोमवार दि. 22 रोजी बँका सुरु होवून 23 रोजी निवडणुकीच्या दिवशी बंद राहणार आहेत. या शिवाय निवडणुकीच्या कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी सोमवारपासूनच रवाना झाल्यास सोमवारीही बऱयापैकी अर्थव्यवहार ठप्प राहतील, अशीच शक्मयता आहे.

निवडणुकीचे काम नसणाऱया कर्मचाऱयांनी जोडून आलेल्या सुट्टय़ांना रजांची जोड देवून सहलींचे नियोजन सुरु केले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास पुढील आठवडाच उजाडेल, अशी शक्मयता व्यक्त होत आहे.