|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तरुण भारत अस्मिता महोत्सवाचा पुन:प्रत्यय आता वेबसाईटवर उपलब्ध

तरुण भारत अस्मिता महोत्सवाचा पुन:प्रत्यय आता वेबसाईटवर उपलब्ध 

महोत्सवातील मनोहारी क्षणांचे घडणार दर्शन

बेळगाव / प्रतिनिधी

तरुण भारत अस्मिता व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजित अस्मिता महोत्सव आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ‘तरुण भारत अस्मिता बाईक रॅली’ला महिलावर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला. या महोत्सवाच्या सर्व क्षणांचे मनोहारी दर्शन आता वेबसाईटच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या बाईक रॅलीच्या भव्यतेचा पुन:प्रत्यय घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बाईक रॅलीशी संबंधित अशा सर्व क्षणांची छायाचित्रे आणि व्हिडिओ आता या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

तरुण भारत अस्मितातर्फे उपलब्ध करून दिलेल्या या वेबसाईटचा संकेतांक asmita.tarunbharat.com असा आहे. अस्मिता महोत्सवाची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करू शकता. या वेबसाईटवर बाईक रॅलीचे दर्शन तसेच विजेत्यांची छायाचित्रे उपलब्ध आहेत. महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची झलक यामध्ये दिसणार आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, फळांपासूनच्या कलाकृती, पुष्परचना आणि टाकाऊतून टिकाऊ या स्पर्धेतील मांडणी पाहता येणार आहे.

डाऊनलोड सुविधा उपलब्ध

अस्मिता महोत्सवाची अनुभूती देणारे क्षण या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यातील फोटो डाऊनलोड करून घेण्याची सुविधाही आहे. त्यामुळे तरुण भारत अस्मिता व्यासपीठातर्फे रॅलीतील सहभागी सदस्यांसाठी ही एक भेट आहे. याकरिता इच्छुकांनी asmita.tarunbharat.com या वेबसाईटला जरूर भेट द्यावी.