|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकायदा तांदूळ प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत

बेकायदा तांदूळ प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत 

वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर केले हजर

प्रतिनिधी/ बेळगाव

झटपट कॉलनी, अनगोळ येथे आढळून आलेल्या बेकायदा रेशन तांदळाचा साठा प्रकरणातील दोघा आरोपींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सुमारे 12 लाख रुपये किमतीचा 600 पोती तांदूळ जप्त करण्यात आला होता.

शेखर विश्वनाथ कबटे (वय 45, रा. झटपट कॉलनी, अनगोळ) व वाहन चालक व मालक किरण दिलीप पाटील (वय 30, रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंडगोडी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी ही कारवाई केली होती. झटपट कॉलनी, अनगोळ येथील एका गोदामात 600 पोती रेशन तांदळाचा साठा करून ठेवण्यात आला होता. हा साठा एम. एच. 09 एल 4417 क्रमांकाच्या गुड्स टेम्पोतून हलविण्यात येणार होता. या संबंधीची माहिती मिळताच गुन्हे तपास विभागाच्या अधिकाऱयांनी अचानक छापा टाकून गुड्स टेम्पो व तांदुळ साठय़ासह दोघा जणांना अटक केली होती. 

 मंगळवारी या दोन्ही आरोपींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.