|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » कोळंबकरांचा शेवाळेंना पाठिंबा

कोळंबकरांचा शेवाळेंना पाठिंबा 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजप महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना जोरदार धक्का बसला आहे.

वडाळा- नायगाव परिसरात राहुल शेवाळे निवडणूक प्रचार करत असताना त्यांनी कालिदास कोळंबकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ गुफ्तगू झाली. त्यानंतर कोळंबकर यांनी शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावली. त्यामुळे मी त्यांची जाहीर स्तुती केली होती. परिणामी काँग्रेसने मला अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी काँग्रेसवर नाराज होतोच. सध्या मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. काँग्रेसवर नाराज आहे. पण लोकसभा निवडणुकीसाठी कुठे ना कुठे काम करावच लागणार, म्हणून मी शेवाळेंचा प्रचार करणार आहे, असं सांगतानाच शेवाळेंचा प्रचार करण्याबाबत आज संध्याकळपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मला अधिकृत आदेश येईलच, असंही कोळंबकर यांनी सांगितलं. यावेळी कोळंबकर यांनी शेवाळेंना वडाळा-नायगाव परिसरातून भरघोस मतदान होईल, असा दावाही केला.