|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात रेल्वेचा स्वतंत्र विभाग

पुण्यात रेल्वेचा स्वतंत्र विभाग 

पुणे / प्रतिनिधी :

पुण्यातील वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण, मेट्रोचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, पुरंदर विमानतळाची निर्मिती, लोहगाव विमानतळाच्या विस्तारिकरणाचे काम, पुण्यात रेल्वेचा स्वतंत्र विभाग यासारख्या आश्वासनांचा समावेश भाजपाच्या संकल्पपत्रात करण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि शहराच्या सांस्कृतिक विकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. चांदणी चौकाजवळील बीडीपीच्या जागेवर प्रस्तावित शिवसृष्टी उभारण्याचाही आवर्जून उल्लेख यात करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे संकल्पपत्र बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. पक्षाचे उमेदवार गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱहे आदी उपस्थित होते. पुणे स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण करून शहरभर जाळे निर्माण करणार, पुरंदर येथील विमानतळ पूर्ण करून लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करणार, पुण्यासाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग सुरू करणार, वाहतुकीसाठी पुण्याबाहेरील 128 किलोमीटर लांबीच्या पुणे शहरातील उपनगरांना जोडणाऱया 36 किलोमीटर रिंगरोडची कामे पूर्ण करणार, अशी आश्वासनेही यात आहेत.