|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्सची 25 टक्के हिस्सेदारी सौदी अरामको खरेदी करणार

रिलायन्सची 25 टक्के हिस्सेदारी सौदी अरामको खरेदी करणार 

मुंबई

 सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान फेबुवारीत आलेल्या भारत दौऱयावेळी त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबत मुलाखत झाली होती. त्यानंतर आगामी काळासाठी त्यांच्यात व्यवहार करण्या संदर्भात घोषणा झाली.

जगातील सर्वात अधिक नफा कमाई करणारी सौदीची कंपनी सौदी अरामको आणि भारतातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामध्ये लवकरच मोठा व्यवहार होणार असल्याचे संकेत आहेत. यात अरामको कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायातील 25 टक्के हिस्सा खदेरी करण्यासाठीची दोघांमध्ये चर्चा सुरु आहे.

जूनमध्ये व्यवहाराची शक्यता

काही प्रमाणात रिलायन्स आपली हिस्सेदारी विकणार असून येणाऱया जूनमध्ये होणाऱया व्यवहारानंतर सौदी अरामकोकडून जवळपास 10 ते 15 अब्ज डॉलर इतकी रक्कम रिलायन्स इंडस्ट्रीजला मिळणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. तर यासंदर्भात अन्य माहिती देण्यास रिलायन्सच्या प्रवक्त्याकडून नकार देण्यात आलेला आहे. 

 रिलायन्सचा सध्या रिफाइनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या व्यवसायाचा विस्तार जवळपास 55 ते 60 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तर कंपनीचा एकूण मार्केट कॅप 122 अब्ज डॉलर म्हणजे 8.5 लाख कोटी रुपयाच्या टप्प्यावर आहे.