|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » श्रीनगरमध्ये मतदानाला हिंसक वळण

श्रीनगरमध्ये मतदानाला हिंसक वळण 

 

 ऑनलाईन टीम / श्रीनगर :  श्रीनगर येथे सुरु असलेल्या मतदानाला हिंसाचारचे गालबोट लागले आहे. सकाळपासून मतदान व्यवस्थित सुरु होते. पण, अचानक दगडफेक सुरु झाल्याने मतदान थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासून आत्तापर्यंत केवळ 0.4 टक्के मतदान झाले आहे.

काश्मिरमध्ये श्रीनगर आणि उधमपूर या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळपासून मतदान व्यवस्थितपणे सुरु होते. पण, अचानक दगडफेक सुरु झाल्याने मतदानाला हिंसक वळण मिळाले. त्यामुळे त्याचा मतदानावरही परिणाम झाला आहे. सकाळपासून अवघ्या 0.4 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानामुळे पूर्ण श्रीनगर बंद आहे. फारुक अब्दुला, जितेंद्र सिंह हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  यासाठी सीआरपीएफ जवानांच्या 400 तुकडय़ा रवाना करण्यात आल्या आहेत.