|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » गांधी-नेहरु कुटुंबाने देशासाठी त्यागच केला

गांधी-नेहरु कुटुंबाने देशासाठी त्यागच केला 

 

ऑनलाईन टीम / अहमदनगर: नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजावून घेतले पाहिजेत. मात्र प्रश्न समजावून घेणारी टीम पंतप्रधनांकडे नाही.