|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मुकेश अंबानींचा मिलिंद देवरांना पाठिंबा

मुकेश अंबानींचा मिलिंद देवरांना पाठिंबा 

 

ऑनलाईन टीम / मुंबई  :  देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी यंदा चक्क काँग्रेसचे उमेदवार खमिलिंद देवरा यांना पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वटिर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवरा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना निवडूण द्या, असे अंबानी यांनी व्हीडिओत म्हटले आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीरपणे पाठिंबा दर्शवला होता. तर, यंदा देवरा यांच्या भरोसा दाखवला आहे.