|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » ‘चौकीदार चोर है’जाहिरातीवर बंदी

‘चौकीदार चोर है’जाहिरातीवर बंदी 

 

ऑनलाईन टीम / भोपाळ:  काँग्रेसकडून प्रसारित होणारी ‘चौकीदार चोर है’ या जाहिरातीवर मध्यप्रदेशच्या संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी बंदी घातली आहे. काँग्रेसकडून प्रसारित करण्यात येत असलेली ‘चौकीदार चौर है’ ही जाहिरात राज्य मीडिया प्रमाणन समितीने रद्द केली आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

भाजपच्या ‘चौकीदार चोर है’ या जाहिरातीवर आक्षेप घेऊन या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. ही जाहिरात बदनामकारक, आक्षेपार्ह आहे. भारत सरकारच्या मीडिया प्रमाणन समितीच्या परवानगीनेच ही जाहिरात प्रसारित केली जात आहे, अशी तक्रार भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली होती.