|Monday, August 26, 2019
You are here: Home » leadingnews » दुसऱया टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर

दुसऱया टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर 

ऑनलाईन टीम / पुणे :

लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांतील 97 जागांवर आज मतदान होत आहे. राज्यातील 10 जागांवर मतदान सुरू आहे. राज्यात दुपारी उन्हामुळे मतदारांचा ओढा कमी होता. मात्र, सायंकाळी 4 नंतर पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रात रांगा लावल्या. दरम्यान, मतदानाला मतदानकर्त्यांचा ओढा कमी झाल्याने अनेकांनी मतदारांना घरीपासून मतदान केंद्रापर्यंत सोडण्या आणण्याची सोय तसेच रागांमध्ये पाण्याची देखील सोय कारण्यात आली. तरी देखील मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगाल 75 टक्के, तामिळनाडू 62 तर जम्मू काश्मीर 43 टक्के मतदान झाले. दुसऱया टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्र 5 व्या क्रमांकावर तर जम्मू काश्मीर 6 व्या क्रमांकावर आहे. काश्मीरमधील परिस्थिती अशांत असताना देखील तेथे 43 टक्के मतदान झाले आहे.

देशातील विविध राज्यात दुसऱया टप्प्यात झालेले मतदान पुढील प्रमाणे :

पश्चिम बंगाल 75.27 टक्के, आसाम 73.32, पुद्दुचेरी 72.40, छत्तीसगड 68.70, तामिळनाडु 63, कर्नाटक 61.80, बिहार 58.14, उत्तर प्रदेश 58.12, ओडिसा 57,41, महाराष्ट्र 55.57, आणि जम्मू काश्मीर 43.37 टक्के मतदान झाले.  

राज्यात 10 जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झाले आहे.

बुलडाणा – 57 .8 टक्के, अकोला – 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली – 60.69 टक्के, नांदेड – 60.88 टक्के, परभणी – 58.50 टक्के, बीड – 58.44 टक्के, उस्मानाबाद – 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के, सोलापूर – 51.98 टक्के  एकूण – 57.22 टक्के