|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » जम्मूमध्ये 43 टक्के मतदान

जम्मूमध्ये 43 टक्के मतदान 

 

ऑनलाईन टीम / श्रीनगर  :  अस्थिर वातावरणातही जम्मू काश्मीरमध्ये 43 टक्के मतदान झाले आहे. काश्मीरमध्ये बडगामध्ये मतदान केंद्रांवर दगडफेक सुरु झाली. अशा वातावरणातही जम्मूतील लोकांनी बाहेर पडून मतदान केले.

मतदान प्रक्रिया संपल्यावर तिथल्या अधिकाऱयांवरही दगडफेक करण्यात आली. पोलीस संरक्षणात तिथल्या मतपेटय़ा नेण्यात आल्या आहेत. श्रीनगर येथे सुरु असलेल्या मतदानाला हिंसाचारचे गालबोट लागले होते. सकाळपासून मतदान व्यवस्थित सुरु होते. पण, अचानक दगडफेक सुरु झाल्याने मतदान थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासून आत्तापर्यंत केवळ 0.4 टक्के मतदान झाले होते.