|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषकासाठी इंग्लंड प्रबळ दावेदार, शास्त्राRचा घरचा आहेर

विश्वचषकासाठी इंग्लंड प्रबळ दावेदार, शास्त्राRचा घरचा आहेर 

 

ऑनलाईन टीम / मुंबई

यंदाच्या विश्वचषकासाठी भारत नाही तर इंग्लंड प्रबळ दावेदार असल्याचे रवी शास्त्री यांनी असे सांगत घरचा आहेर दिला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये इंग्लंडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याचबरोबर त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजीही बळकट आहे.

विश्वचषकाला जाण्यापूर्वी प्रशिक्षक संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतो. खेळाडूच्या तांत्रिक गोष्टींपेक्षा त्यांची मानसिकता कधी सुधारेल, सकारात्मक कशी होईल, असा प्रयत्न प्रशिक्षक करत असतात. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी तारे तोडल्याचे मत चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. भारतीय संघाच्या निवडीच्यावेळीही शास्त्री हजर नव्हते. निवड समिती सदस्य आणि कर्णधार विराट कोहली यांनी एकत्र येऊन विश्वचषकाच्या संघाची निवड केली. पण यावेळी शास्त्री नेमके कुठे होते, हा सवाल चाहत्यांना पडला आहे.