|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स 135 अंकाच्या घसरणीसह बंद

सेन्सेक्स 135 अंकाच्या घसरणीसह बंद 

वृत्तसंस्था / मुंबई :

मुंबई शेअर बाजार कालच्या महावीर जयंतीच्या सुट्टीनंतर गुरुवारी सकारात्मक सुरुवात झाली होती. परंतु दिवसभरातील झालेल्या व्यवहारानंतर नफा कमाईची नोंद आणि जागतिक स्तरावरिल कमजोर संकेतामूळे सेन्सेक्सचा निर्देशाकात शेवटच्या क्षणी 135 अंकानी कमजोर होत बंद झाला. या अगोदर झालेल्या व्यवहारात इंड्रा डे मध्ये बाजाराने 39,487.45 अंकानीची कमाई केली होती.

तर यांचा प्रभाव गुरुवारी नकारात्मक दिसून आली. यात सेन्सेक्स 39,140.28 वर पोहोचत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजरातील निफ्टी 34.35 अंकानी घसरण होत 11.752.80 वर स्थिरावला. मान्सून हा सर्वसामान्य राहणार असल्याचे अनुमान नुकतेच हवामान खात्याने सादर केले आहे.

 बुधवारी बाजार महावीर जयतीनिमित्त बंद होता. त्यामुळे गुरुवारी बाजारात कभी खुशी कभी गम असे काहीसे वातावरण राहिले. दिवसभरातील व्यवहारात येस बँक ,वेदान्ता, इंडसइंड बँक, टाटा स्टील, लार्सन ऍण्ड टुब्रो, स्टेट बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि आयटीसी यांच्या समभागात 4.18 टक्क्यांनी घसरणीची नोंद करण्यात आली. या उलट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निर्देशाकात 2.79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा मोटर्स, एशियन पेन्टस, टीसीएस, कोल इंडिया हीरोमोटो कॉर्प, ऍक्सिस ब्ँाक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग 2.32 टक्क्यांनी तेजी नोंदवण्यात आली.

विदेशी गुंतवणूकादारांकडून गुंतवणुकीत वाढ होत 1,038.58 कोटीच्या घरात पोहोचली आहे. तर देशांतर्गत उलाढाल बघता मंगळवारी बाजारात 37.22 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली होती.