|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » अखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करकरेंबद्दलचे वक्तव्य मागे

अखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून करकरेंबद्दलचे वक्तव्य मागे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात पीडितेचे वडिल एआयए कोर्टात गेले असून, निवडणूक थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधनाने वादळ उठले असताना भाजपने मात्र हे साध्वी यांचे वैयक्तिक मत आहे, असे स्पष्ट करत हात झटकले आहेत. दरम्यान, चौफेर टिका झाल्यानंतर प्रज्ञा सिंह साध्वी यांनी केलेले करकरे यांच्याबाबतचे वक्तव्य माघार घेतले आहे.