|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉन जुलैपासून चीनमधील ई-कॉमर्सचा व्यवसाय बंद करणार

ऍमेझॉन जुलैपासून चीनमधील ई-कॉमर्सचा व्यवसाय बंद करणार 

पंधरावर्षांपूर्वी सुरु केला होता व्यवसाय :

वृत्तसंस्था/ शांघाय

ऍमेझॉन कंपनीने येत्या 18 जुलैपासून आपला ई-कॉमर्सचा व्यवसाय बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार गुरुवारी चीनमधील ग्राहकांना कंपनीकडून सेवा बंद केली जाणार असल्याचे म्हटले आहे.  ऍमेझॉनला त्यांची उत्पादने विकावयाची असल्यास तेथील ग्राहकांना जागतिक स्तरावरिल विक्रीसाठी उपलब्ध असणारी सुविधा वापरावी लागेल. तर ऍमेझॉन आपल्या अन्य प्रकारच्या सेवा मात्र सुरु ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

ऍमेझॉन चीनमध्ये वेब सर्व्हिसेस, किंडल ई-बुक्स आणि क्रॉस बॉर्डर पथक असणाऱया सेवा मात्र कार्यान्वीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती ब्लूमबर्गकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगितले आहे.

चीनमध्ये स्थिरावण्यास ऍमेझॉनला अपयश

चीनमध्ये ई-कॉमर्स बाजारात ऍमेझॉन आपला व्यवसाय विस्तार करण्यासह विशेष जागा बनविण्यात अपयशी ठरली आहे. ऍमेझॉनला अलीबाबा आणि जेडी डॉट कॉम यांच्यासोबत स्पर्धेला तोंड देताना अपयश आले आहे.

2004मध्ये रिटेल व्यवसायापासून चीनच्या बाजारात प्रवेश

ऍमेझॉनने 2004 मध्ये ऑनलाईन बुक विक्रीला सुरुवात करत आणि जोयोसोबत भागीदारी केल्यावर त्यांनी चीनच्या बाजारात प्रथम प्रवेश केला होता. परंतु त्यात फारसे यश मिळविण्यात कंपनीला यश आले नाही. 2018च्या चौथ्या तिमाहीत ऑनलाईन किरकोळ बाजारात ऍमेझॉनचा शेअर फक्त 0.6 टक्के होता.