|Monday, August 19, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंग 1.37 लाख किंमतीच्या गॅलेक्सी फोल्डवर प्रश्नचिन्ह

सॅमसंग 1.37 लाख किंमतीच्या गॅलेक्सी फोल्डवर प्रश्नचिन्ह 

स्क्रिन तुटण्याच्या तक्ररींची नोंद : 26 एप्रिलपासून विक्री सुरु होणार 

वृत्तसंस्था/ लंडन

दक्षिण कोरियाची तत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी सॅमसंगकडून नुकतेच फोल्डेबल स्मार्टफोनचे सादरीकरण करण्यात आले होते. तर त्याची विक्री चालू महिन्यातील 26 एप्रिलपासून होणार आहे. व्यावसायिक सादरीकरण करण्यात आल्यावर फोल्डेबल स्मार्टफोनचे डिव्हाईस अन्य माध्यम संस्थाना आणि टेक्निकल  तज्ञाकडे पाठविण्यात आले होते. त्यावर अनेक तज्ञांनी या स्मार्टफोनच्या मजबूतीवर प्रश्न उभारले होते. तर काही दिवसांमध्येच या फोनची स्क्रिन तुटण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सदरचा स्मार्टफोन हा जवळपास 1980 डॉलर (1.37 लाख रुपये) किंमतीचा आहे.

स्क्रिन योग्य काम करत नाही : रिव्यूअर

गॅलेक्सी फोल्डचे रिव्यूअर यूनिट माझ्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच कालावधीत या स्मार्टफोनचा वापर करताना तो पूर्णणे तुटला होता. आणि आता तो कोणत्याही प्रकारचे काम करत नसल्याचे दिसून आले आहे परंतु असा अनुभव सर्वांनाच आला असेल हे सांगणे अस्पष्टच असल्याची माहिती   टेक रिव्यूअर मार्क गरमॅन यांनी यावेळी दिली आहे. 

कंपनीचा दावा

सदरचा स्मार्टफोन तयार करताना त्याला रोबोटच्या मदत घेतली होती. आणि त्याच्या अनेक बाबीची पडताळणी करण्यात आल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. जवळपास 2 लाख वेळा स्मार्टफोन फोल्ड अन् अनफोल्ड करण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनी दिले होते. तर स्मार्टफोन गॅलेक्सीच्या मजबुतीबाबतचा विश्वास घट असल्याचे सांगितले होते.