|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचे सात कसोटीपटू इंग्लिश कौंटीत खेळणार

भारताचे सात कसोटीपटू इंग्लिश कौंटीत खेळणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येत्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप मालिकेच्या तयारीसाठी भारताचे सात कसोटीपटू इंग्लंडमधील विविध कौंटी संघातून खेळणार आहेत.

बीसीसीआयने निवडलेल्या खेळाडूंत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयंक अगरवाल, आर. अश्विन, इशांत शर्मा यांचा समावेश असून हे सर्वजण कौंटी क्रिकेट खेळणार आहेत. पुजाराने याआधीच यॉर्कशायर कौंटीशी तीन वर्षांचा करारा केलेला असून तो याच संघातून खेळेल. रहाणे येत्या आठवडय़ात हॅम्पशायर कौंटीशी करार करण्याची अपेक्षा असून सीओएच्या मंजुरीची तो प्रतीक्षा करीत आहे. ‘सीओए प्रमुख विनोद राया यांनी मंजुरी दिलेली आहे. पण डायन एडलजी व ले. जन. रवि थोडगे यांची अद्याप मंजुरी मिळालेली नाही,’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱयाने सांगितले.