|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी आमदाराची जबाबदारी स्विकारून काम करणार – – शरद पवार

माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी आमदाराची जबाबदारी स्विकारून काम करणार – – शरद पवार 

प्रतिनिधी/ नातेपूते

मी तुमच्या तालुक्याचा आमदार होणार नाही परंतु तुमच्यासाठी आमदार म्हणून काम करणारा माळशिरस तालुक्यातील कोणत्याही गावातील माणसावर जर अन्याय होत असेल तर आम्ही  गप्प बसणार नाही त्या ठिकाणी मी मदत करणार या भागातील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी विजय दादांना त्यांच्या मागणी प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची मंत्रीपदाची खाती दिली तेव्हा त्यांच्या स्थिरीकरणाचा डोक्यात प्रश्न आला नाही आणि आज सांगतात स्थिरीकरणाच्या बाबतीत आमची गळचेपी होत होती

       मोदी सभेत सांगतात पवारांच्या घरात भांडणे चालल्यात म्हणून

आमच्या घरात तर काहीच भांडणे नाहीत मग मोदींना हे कसे समजले हि भेट

झाल्यावर विचारतो मोदी दुष्काळावर तसेच महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत त्याच्यावर काहीच बोलत नाहीत

असे प्रतिपादन  शरद पवार यांनी नातेपूते येथील

माढा मतदार संघातील  लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचार्थ सभेमध्ये केले

      यावेळी व्यासपीठावर आमदार रामहरि रूपनवर, प्रकश पाटील, रामदास देशमुख, फत्तेसिंह माने पाटील, शंकरनाना देशमुख,पांडुरंग देशमुख, सुभाष पाटील, हिंदूराव माने पाटील, माणिक वाघमोडे, रघुनाथ कवितके, शरद मोरे, सत्यशिल पाटील, राजाभाऊ हिवरकर, भानुदास पाटील, आपासाहेब कर्चे, भानुदास पाटील, भारत उराडे, भिमराव फुले, धैर्यशैल देशमुख, राजाभाऊ खिलारे, जयंत बगाडे, उत्तम बरडकर ,नाना काळे, बबन कोरटकर , भगवान पिसे ,दादा पालवे , ज्ञानदेव खंडागळे, अक्षय भांड आदि मान्यवर उपस्थित होते

     ते पुढे बोलताना म्हणालेकी जाधव नावाचे जवान तीन वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये असताना  त्यांना सोडविण्यासाठी मोदींची 56 इंच छाती त्या जवानास का सोडवू शकली नाही मोदी महाराष्ट्रात प्रचार सभेसाठी अनेक ठिकाणी येऊन आमच्यावर टिका करून गेले दुष्काळामूळे अनेकांना पशूधन सोडून द्याची वेळ आली आहे त्याच्यावर काहिच करण्याचा विचार नाही माझ्यावर कितीही टिका केली तरी या देशातील शेतकरी व साखर धंद्याला मदत करण्यासाठीच माझे राजकारण आही