|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दुष्काळाबाबत पंतप्रधान मोदी यांचे मौनच : शरद पवार

दुष्काळाबाबत पंतप्रधान मोदी यांचे मौनच : शरद पवार 

प्रतिनिधी      / नातेपुते

मी तुमच्या तालुक्याचा आमदार होणार नाही, परंतु तुमच्यासाठी आमदार म्हणून काम करणारा माळशिरस तालुक्यातील कोणत्याही गावातील माणसावर जर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्या ठिकाणी मी मदत करणार, या भागातील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी विजयदादांना त्यांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची मंत्रीपदाची खाती दिली, तेव्हा त्यांच्या स्थिरीकरणाचा डोक्यात प्रश्न आला नाही आणि आज सांगतात स्थिरीकरणाच्या बाबतीत आमची गळचेपी होत होती. मोदी सभेत सांगतात पवारांच्या घरात भांडणे चालल्यात म्हणून आमच्या घरात तर काहीच भांडणे नाहीत मग मोदींना हे कसे समजले ही भेट झाल्यावर विचारतो. मोदी दुष्काळावर तसेच महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत, त्याच्यावर काहीच बोलत नाहीत अशी टीका शरद पवार यांनी केले.

  नातेपूते येथील माढा मतदार संघातील लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचार्थ सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रामहरी रूपनवर, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रामदास देशमुख, फत्तेसिंह माने पाटील, शंकरनाना देशमुख, पांडुरंग देशमुख, सुभाष पाटील, हिंदूराव माने पाटील, माणिक वाघमोडे, रघुनाथ कवितके, शरद मोरे, सत्यशिल पाटील, राजाभाऊ हिवरकर, भानुदास पाटील, आपासाहेब कर्चे, भानुदास पाटील, भारत उराडे, भिमराव फुले, धैर्यशैल देशमुख, राजाभाऊ खिलारे, जयंत बगाडे, उत्तम बरडकर ,नाना काळे, बबन कोरटकर, भगवान पिसे, दादा पालवे, ज्ञानदेव खंडागळे, अक्षय भांड आदि मान्यवर उपस्थित होते.

   पवार म्हणाले, जाधव नावाचे जवान तीन वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये असताना  त्यांना सोडविण्यासाठी मोदींची 56 इंच छाती त्या जवानास का सोडवू शकली नाही. मोदी महाराष्ट्रात प्रचार सभेसाठी अनेक ठिकाणी येऊन आमच्यावर टीका करून गेले, दुष्काळामुळे अनेकांना पशूधन सोडून द्याची वेळ आली आहे, त्याच्यावर काहीच करण्याचा विचार नाही. माझ्यावर कितीही टीका केली तरी या देशातील शेतकरी व साखर धंद्याला मदत करण्यासाठीच माझे राजकारण असणार आहे असेही पवार यावेळी म्हणाले.

उमेदवार संजय शिंदे म्हणाले, माढा मतदारसंघाची देशात चर्चा आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. या दिलेल्या संधीचे मतदारसंघातील प्रश्न सोडवून सोने करणार असल्याचे सांगितले.

  यावेळी सुभाष पाटील, प्रकाश पाटील, जयंत बगाडे, समाधान फाटे, रामदास देशमुख आ. रामहरी रुपनवर, सुजय माने पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला नागरिकांनी गर्दी केली होती.