|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वडगाव येथे घराला आग

वडगाव येथे घराला आग 

बेळगाव / प्रतिनिधी

कारभार गल्ली, वडगाव येथील एका घराला आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे एका गरीब कुटुंबावर संकट ओढवले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. केवळ सुदैवानेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कारभार गल्ली वडगाव येथील रहिवासी असणाऱया इंदूबाई सालगुडे यांच्या घरामध्ये हा आगीचा प्रकार घडला. घरामध्ये लावून ठेवलेला दिवा कलंडल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आग लागून धुराचे लोट येऊ लागताच आसपासच्या भागातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने परिश्रम घेऊन आग आटोक्मयात आणली. मात्र घरातील आवश्यक सामग्री भस्मसात झाली.