|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » कानपुरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले

कानपुरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले 

ऑनलाईन टीम / कानपूर :

उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेचे 12 डबे अचानक रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

पूर्वा एक्सप्रेस ही हावडा येथून नवी दिल्लीला जात होती. शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात झाला. या डब्यामध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे.. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून, डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.