|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » राफेल प्रकरणातील पैसा अनिल अंबानींकडून परत घेऊ : राहुल गांधी

राफेल प्रकरणातील पैसा अनिल अंबानींकडून परत घेऊ : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / बेळगाव :

काँग्रेस सत्तेवर आल्यास राफेल प्रकरणात देण्यात आलेले हजारो कोटी अनिल अंबानींकडून काढून घेवून शेतकरी व गरीब लोकांना देऊ, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.

चिक्कोडी येथील काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱयांचे कर्ज माफ करा, असे सांगितले तर ते याला तयार होत नाहीत; पण अनेक उद्योगपतींची कर्जे त्यांनी माफ केली आहेत. काँग्रेस पक्ष सत्य, न्याय, प्रेम आणि बंधुभाव यासाठी ही निवडणूक लढवत आहे तर असत्य, अन्याय, विद्वेष आणि खोटेपणा हेच भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान मोदी हे अनिल अंबानीचे चौकीदार आहेत.