|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर लाईन ची लोकलसेवा ठप्प

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर लाईन ची लोकलसेवा ठप्प 

ऑनलाईन टीम / नवी मुंबई :

ठाणे वाशी रेल्वेमार्गावरील सानपाडा रेल्वेस्टेशनजवळ शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. 30/12 किलोमीटर लगत हा प्रकार घडला. त्यामुळे हार्बर लाईन मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली आहे. ठाणेकडून वाशीला जाणाऱया मार्गावर लोकल ठप्प झाल्या असून, ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु आहे.