|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएचे छापे

आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएचे छापे 

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :

आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने हैदराबादमधील तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी sशनिवारी सकाळी छापा टाकला. एनआयएच्या पथकाने या चार ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. मात्र, या कारवाईबाबत अद्याप एनआयएने अधिकृत माहिती दिली नाही.