|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » देशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा

देशभरातील 400 साहित्यिकांचा मोदींना पाठिंबा 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी लेखक आणि कलाकारांच्या समुहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता देशभरातील 400 साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली अशा प्रसिद्ध साहित्यिकांचा नरेंद्र मोदींना समर्थन देणाऱया 400 साहित्यिकांमध्ये समावेश आहे. भारतीय साहित्यिक संघटनेच्या झेंडय़ाखाली एकत्र आलेल्या या साहित्यकांनी देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान आणि विकास कायम ठेवण्यासाठी मोदींना मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचे महत्त्व सर्वतोपरी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मत देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान, एकात्मता, सांप्रदायिक, सद्भाव आणिविकास कायम राखण्यासाठी द्यावे, असे आवाहन आम्ही साहित्यिक करत आहोत.’ असे या साहित्यिकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात देशाची प्रति÷ा वाढवणारे, राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध असणारे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे नेते असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.