|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » शत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा

शत्रुघ्न सिन्हा यांचा स्वभावच धोका देण्याचा 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :   शत्रुघ्न सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. पंधरा दिवसांतच त्यांनी काँग्रेससोबत दगा फटका केल्याचे ट्विट भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी केले.

सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी 15 दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. तसेच सिन्हा कायम भाजपला धोका देत राहिले. आता पटना साहिबमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले सिन्हा यांच्याविषयी 15 दिवसांतच काँग्रेसकडून तक्रारी सुरू झाल्या आहेत. पूनम सिन्हा यांच्याविरुद्ध लखनौमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सिन्हा यांनी पक्षधर्म निभवावा असंही म्हटल्याचे पांडे यांनी आपल्या ट्वटिमध्ये नमूद केले आहे.