|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा

पुण्यातील कोथरुडमध्ये हुक्का पार्लरवर छापा 

ऑनलाईन टीम / पुणे :

हुक्का पार्लरवर बंदी असतानाही हुक्का पार्लर चालवणाऱया पार्लरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यावेळी हुक्का ओढणाऱया 6 जणांवर कारवाई करण्यात आली तर रेस्टॉरंट मालक, मॅनेजर व 2 वेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरुड परिसरातील रॉयल लॉन्ज गार्डनर रेस्टॉरन्टमध्ये बंदी असतानाही हुक्का पार्लर सुरु होते. छापा टाकून पोलिसांनी पार्लरमधून 45 हजार 535 रुपये,23 हजार 935 रुपये किंमतीची इंडियन मेड फॉरेन लिकरचे 7 बॉक्स आणि 21 हजार 600 रुपये किंमतीचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आणि साहित्य जप्त केले आहे. संबंधितांवर मुंबई दारू बंदी अधिनियम व सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 नुसार कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.