|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » चुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका

चुपके चुपके च्या रिमेकमध्ये राजकुमार राव करणार धर्मेंद्रची भूमिका 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा प्रसिद्ध ‘चुपके चुपके’ या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक येतोय. या ’रिमेक’मध्ये अभिनेता राजकुमार राव धर्मेंद्रची भूमिका साकारणार आहे. 11 एप्रिल 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुपके चुपके’ सिनेमाला या वषी तब्बल 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमामध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया भादुरी, शर्मिला टागोर आणि ओम प्रकाश यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

सुत्राच्या माहितीनुसार, निर्माता भूषण कुमार आणि लव रंजन हे दोघे मिळून या सिनेमाचा रिमेक बनवणार आहेत. या सिनेमाचा रिमेक करण्याची कल्पना राजकुमारला आवडली असून तो सिनेमात भूमिका करण्यासाठी तयार असल्याचेही त्याने सांगितले आहे.