|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » स्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस

स्वतःचे लेकरु होत नाही, मात्र बारस करायची हौस 

 

ऑनलाईन टीम / पंढरपूर :  भाजप वाल्यांना स्वतःचे लेकरु होत नाही. मात्र, बारसं करायची हौस असल्याने शेजाऱयाचं लेकरु आणून पाळण्यात घालतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भाजपवर टीका केली. भाजपचे 80 टक्के उमेदवार हे काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आयात केलेले आहेत. आपल्या लेकरांवर हे बारशाचा आनंद घेतात आणि कमळ फुलले, असे सांगत भाजपच्या इनकमिंगवर निशाणा साधला.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी आज कुर्डुवाडी येथील सभेत मुंडे बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही पवार यांच्या घरापर्यंत पोहचत असाल तर मी तुमच्या घरात घुसू का? असा सवाल मुंडे यांनी केला. मोदीसाहेब तुमचे आणि यशोदाबेनचे काय झाले? हे तरी सांगा असं म्हणत मुंडे यांनी थेट मोदींना टोला लगावला.