|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का ?

बाटला हाऊस संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण हा जवनांचा अपमान नाही का ? 

 

 ऑनलाईन टीम / बिहार :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या अररिया प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करणाऱया काँग्रेसवर बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. 26/11 ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याऐवजी काँग्रेसने हिंदूंना दहशतवाद या शब्दाशी जोडून राजकारण केले असा आरोप यावेळी पंतप्रधानांनी केला.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमी व्होट बँकेचे राजकारण केले आहे. दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये मध्ये भारतीय जवानांनी दहशतवादांची रणनीती उधवस्त केली. मात्र दहशतवाद्यांवर झालेल्या कारवाईने आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या डोळय़ात अश्रू आले. या कारवाईत ज्या जवानांनी बाटला हाऊसमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं. त्यात शहीद झालेल्या जवानांचा हा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.