|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापुरात धनदांडग्यांचे राजकारण

कोल्हापुरात धनदांडग्यांचे राजकारण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूरच राजकारण हे धनदांडय़ग्यांच राजकारण आहे. लोकसभेपासून ते महापालिकेच्या निवडणुकीत येथे करोडो रुपयांचा चुरडा होतो. येथील   धनदांडय़ांची प्रस्थापित व्यवस्था या निवडणुकीत मोडीत काढा, सामान्य कुटुंबातील उमेदवारही पैशाशिवाय निवडूण येवू शकतो, हे दाखवून देण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

  डॉ. अरुणा माळी यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील गांधी मैदानात वंचित बहूजन आघाडीची जाहीर सभा झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ऍड. आंबेडकर बोलत होते.  

   साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहिद हेमंत करकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा त्यांनी तिखट शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, मोदी यांच्याकडुन दहशतवादी प्रवृत्तीला आश्रय दिला जात आहे. हे साध्वी यांच्या विधानावरुन स्पष्ट होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे पेरले आहे, तेच आता उगवत असल्याचे दिसून येत आहे. जे पंतप्रधान स्वतःच्या पत्नीला न्याय देवू शकले नाहीत, ते सामान्य जनतेला काय न्याय देणार असा सवाल उपस्थित करत सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, नोटा बंदीचा अधिकार रिझर्व बँकेच्या गर्व्हनर यांना असताना मोदी यांनी स्वतःच्या अधिकारात नोटबंदी केली. काळा पैसा असणाऱयांना 70:30 च्या प्रमाणात लुटले. आता हेच लोक पुन्हा सत्ता मागत आहेत. जर का चूकून त्यांच्या हातात सत्ता दिली तर ते गरीबांनाही लुटतील. त्यामुळे या लुटारु सरकारच्या हातात सत्ता देवू नका, असे आवाहन त्यांनी केले. कसाबला गुजरातच्या पोरबंदर मार्गे घेवून येणाऱया बोट मालकाचे काय केले?  कसाबच्या हल्ल्यात करकरे, साळसकर, कामटे, ओंबाळे यांना लागलेल्या गोळय़ा कुठे आहेत. याचे उत्तर अद्याप दिलेले नाही. काँगेस आघाडीने सुद्धा याचा पाठपुरावा केलेला नाही.

  आघाडीचे प्रवक्ते लक्ष्मण माने म्हणाले, उच्च शिक्षण घेवूनही आज तरुणांच्या हाताला कामा नाही. डॉ. अरुणा माळी यांची उमेदवारी म्हणजे बेरोजगारांचा आवाज आहे. हा आवाज संसदेत उठविण्यासाठी माळी यांना विजयी करा, असे आवाहन माने यांनी केले.

 उमेदवार अरुणा माळी म्हणाल्या, सामाजिक अहिंसा संपविण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या बेगडय़ा प्रेमातून बाहेर पडा, असे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघडीने राजकीय भूकंप केला आहे. याचे हादरे सत्ताधाऱयांना बसत असून ते सैरवैर पळत आहेत. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम का मिळत नाही याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहूजन आघाडीला विजयी करा, असे आवाहन माळी यांनी केले.

  सभेला हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार असलम सय्यद, प्रा. सुकुमार कांबळे, आघाडीचे प्रवक्ते लक्ष्मण माने, शाहिद शेख, शिवानंद हैबतपुरे, सलिम खेडेकर, श्रावण देवरे, संग्राम सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.