|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन

शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन 

8 मे रोजी निघणार भव्य चित्ररथ मिरवणूक

प्रतिनिधी/ बेळगाव

दरवर्षीप्रमाणे यावषीही शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.  8 मे रोजी भव्य चित्ररथ देखावा मिरवणूक निघणार आहे. 6 मे पासून या उत्सावाला प्रारंभ होणार असून शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी आर. विशाल यांना देण्यात आले.

बेळगावमधील शिवजयंती ही ऐतिहासिक शिवजयंती मानली जाते. चित्ररथ देखावा मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच इतर राज्यांतूनही शिवप्रेमी येत असतात. ही जयंती दरवषीच मोठय़ा उत्साहात साजरी होत असते. आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्याआधी ही चित्ररथ देखावा मिरवणूक होणार आहे. तेव्हा आम्हाला ही शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यास कोणतीच अडचण येणार नाही. तरी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, गणेश दड्डीकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.