|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात 7 ठार, 34 जखमी

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात 7 ठार, 34 जखमी 

ऑनलाईन टीम / आग्रा :

उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वर शनिवारी रात्री खासगी बस ट्रकवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या चालकासह 7 जण ठार झाले तर 34 जण जखमी झाले आहेत.

मैनपुरी जिह्यातील करहल पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीत ट्रक बिघडल्यामुळे एक्सप्रेस वेवर उभा होता. दरम्यान मध्यरात्रीनंतर वेगाने येणारी प्रवासी बस ट्रकवर आदळली. ट्रक उभा आहे की सुरु आहे हे बस चालकाच्या लक्षात आले नाही. ही बस दिल्लीहून वाराणसीला जात होती. या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी प्रवास करत होते. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.