|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » छत्तीसगडमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

ऑनलाईन टीम / बिजापूर :

छत्तीसगडमधील बिजापूर जिह्यातील पामेड परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

नक्षलविरोधी विशेष पथक आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.