|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून निषेध

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून निषेध 

तेथील परिस्थितीवर आमची नरज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा भारतीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी निंदा केली असून, तेथील भारतीय उच्चायुक्ताच्या आम्ही संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीवर आमची पूर्ण नजर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुःखत घटनेत निषेध केला असून, याबाबतीत भारत श्रीलंकेसोबत उभा आहे. भारत श्रीलंकेला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.

तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या बॉम्बब्लास्ट घटनेचा निषेध केला आहे. तेथे राहणाऱया भारतीय नागरिकांना कोणतिही मदत आणि मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे.