|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

शहिदांच्या नावाने मतं मागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद हेमंत करकरे यांच्या अपमानाबाबत शांत का आहेत, करकरेंविषयी वादग्रस्त विधान करणाऱया साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे मोदी हे सुद्धा दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सध्या निवडणुकीसाठी करोडो रुपयांचा चुराडा सुरू असताना गरीब माणूस या निवडणुकीत जिंकून येऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी वंचित आघाडीने उमेदवार उभे केले आहेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.