|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मायावतींकडून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या

मायावतींकडून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी प्रतिस्पर्धी असलेले बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहे. दोन्ही पक्ष एकत्र सभा घेऊन मतदारांना महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, फिरोजाबाद येथील प्रचारसभेत मायावतांनी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खडसावले.

मायावती यांची फिरोजाबाद शनिवारी अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा झाली. या सभेत मायावती सभेला संबोधित करत असताना सपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा बसपाच्या बसपा कार्यकर्त्यांची शिस्त तुम्ही घ्यायला हवी. बसपा कार्यकर्ते पक्षाचे आणि पक्षाध्यक्षाचे शांततेने ऐकूण घेत असल्याचे मायावतींनी सांगितले.