|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » केंद्रातील सरकार हे चोर लुटारुंचे

केंद्रातील सरकार हे चोर लुटारुंचे 

 

 ऑनलाईन टीम / कोल्हापूर :  भारतीय चलनावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांचा अधिकार असतो. पंतप्रधानांना चलन बदलण्याचा कोणताही अधिकारी नसताना त्यांनी केवळ लूट करण्याच्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा बाहेर काढण्याची गर्जना करणाऱयांनी कमिशनवर नोटा बदलून दिल्या. नोटा बदलून देणारे केंद्रातील सरकार चोर, लुटारूंचे असून, पंतप्रधानपदावर बसलेले नरेंद्र मोदी लुटारू आहेत,’ असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

गांधी मैदान येथे शनिवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी व हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ऍड. आंबेडकर म्हणाले, आरबीआयकडून निघणाऱया चलनावर बँकेच्या गव्हर्नरांची स्वाक्षरी असते, पण पंतप्रधानांनी काळय़ा पैसेवाल्यांना अभय देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 30 ते 70 टक्क्मयांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणारे हे सरकार चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचे सरकार आहे.’