|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » धोनीला व़िश्रांतीची गरज

धोनीला व़िश्रांतीची गरज 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, असं मत माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.

धोनीला पाठदुखीचा त्रास होत असून, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीदरम्यान त्याच्या पाठदुखीनं डोकं वर काढलं होतं. त्याला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत विश्रांती देण्यात आली होती. ’वर्ल्डकप स्पर्धा महत्वाची आहे. त्यामुळं धोनीला आयपीएलच्या एक ते दोन लढतींमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे असं माझं मत असून, त्याचा पाठदुखीचा त्रास दूर झाला पाहिजे,’ असं श्रीकांत यांनी टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ सामन्यांमधील सहा डावांमध्ये एकूण 230 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं तीन आयपीएल स्पर्धा जिंकल्या आहेत.