|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » हल्ल्याचा इशारा आधीच दिला होता

हल्ल्याचा इशारा आधीच दिला होता 

 

 ऑनलाईन टीम / कोलंबो  :  श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेआधीच पोलीस प्रमुखांनी आत्मघाती हल्ल्याचा इशारा दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

ईस्टर संडे साजरा होत असताना आत्मघाती हल्लेखोरांनी कोलंबोतील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांना लक्ष्य केलं. सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा बळी गेला आहे. तर 400 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढतच आहे. मृतांमध्ये 8 विदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याचं वृत्त आहे. रविवारी सकाळी झालेल्या या हल्ल्याआधी पोलीस प्रमुखांनी आत्मघाती हल्ल्याच्या शक्मयतेचा इशारा दिला होता, अशी माहिती उपलब्ध कागदपत्रांचे आधारे समोर आली आहे.