|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागल शहरात पोलिसांकडून पथसंचलन

कागल शहरात पोलिसांकडून पथसंचलन 

प्रतिनिधी/ कागल

बुधवार दि. 23 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सदरच्या निवडणुकीचे मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कागल तालुक्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रविवारी सकाळी कागल शहरातून पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. यामध्ये एकूण 288 पोलीस कर्मचारी, 202 होमगार्ड व एसआरपीचे जवान सहभागी झाले होते. बंदोबस्तासाठी 9 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.