|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज 

शहर प्रतिनिधी/ फलटण

माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची तयारी झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपने पार पडण्यासाठी फलटण तालुक्यातील शासन यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.

43 माढा लोकसभा मतदार संघ व 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 342 मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रांसाठी 3213 कर्मचाऱर्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 55  जीपसह अन्य गाडय़ा, 6 ट्रक, 51 एसटी बसेस अशी एकूण 112 वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. मंगळवार 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता यावेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान करताना मतदान ओळखपत्राशिवाय इतर छायाचित्र असणारे 11 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. 43 माढा लोकसभा मतदार संघ व 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 342 मतदान केंद्रे असून यामध्ये फलटण तालुक्यातील 298 केंद्रांचा व कोरेगाव तालुक्यातील उत्तर कोरेगाव मधील 44 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मतदार संघात 1 लाख 70 हजार 387 पुरुष मतदार,  1 लाख 59  हजार 775 महिला मतदार व 1  तृतीय पंथी मतदार, 1 हजार 730 दिव्यांग मतदार असे एकूण 3 लाख 30 हजार 163 मतदार आहेत.

निवडणूक कामी 42 क्षेत्रीय अधिकारी,  3 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 45 अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण 2 हजार 52 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. एकंदरीत 3 हजार 168 एवढे कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.  यासाठी एकूण 864 बॅलेट युनिट, 432 कंट्रोल युनिट, 449 व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी 342 मतदान केंद्रावर मतदानासाठी 342 मतदान यंत्रे सिलिंग केलेले आहेत. तसेच 65 मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. याचबरोबर 342 बीएलओ, 221 आशा सेविका व 660 स्वयंसेवक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आली असल्याची माहिती प्रांतआधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.