|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ब्रम्हचैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान

ब्रम्हचैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान 

प्रतिनिधी / वडूज

सामाजिक कार्यकर्ते व पानपट्टी व्यवसायिक बबनराव सरतापे यांनी हनुमान जयंती सप्ताहाचे औचित्य साधून सद्गुरू शिक्षण संस्थेच्या ब्रम्हचैतन्य अनाथ विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटप केले.

या कार्यक्रमास नगरसेवक प्रदीप खुडे, सोमनाथ जाधव, शिक्षक संघाचे अध्यक्ष विद्यासागर माने, येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर, प्रा. अजय शेटे, अनिरुध्द लावंगरे, श्री. भोकरे, संस्थाचालक राजेंद्र वावरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. शेटे, श्री. माने, क्षीरसागर व खुडे यांनी सरतापे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच अनाथ विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करणे हा मनस्वी समाधानाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. वावरे यांनी स्वागत, तर अशोकराव गलंडे यांनी आभार मानले. संस्थेच्यावतीने सरतापे यांचा सत्कार करण्यात आला.