|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुंबईकर मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप

मुंबईकर मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप 

प्रतिनिधी/ वडूज

आपल्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. जगाच्या स्पर्धेत गावातील मुले टिकावीत. तसेच चांगला अभ्यास करुन मुले प्रशासकीय अधिकारी व्हावीत या उदात्त हेतूने गावातील मुंबईकर मंडळाने होतकरु विद्यार्थ्यांना राज्यसेवा स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तकांचे मोफत वाटप केले.

नुकताच श्री हनुमान मंदिरात पुस्तक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, वडूज वि.का.स. सेवा सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भिकू कंठे, येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर, सरपंच मिनाक्षी चोरामले, दिगंबर चोरामले, संजय जाधव, भानुदास जाधव, ब्रम्हदेव जाधव, बबन जाधव, प्रकाश जाधव, सोपान जाधव, सुरेश जाधव, ज्ञानदेव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सभापती मांडवे, श्री. गोडसे व क्षीरसागर यांनी मुंबईकर मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. अशा विधायक कार्यक्रमामुळे गावचा नावलौकीक वाढण्यास मदत होईल, असा आशावादही व्यक्त केला. दिगंबरशठे चोरामले यांनी प्रास्ताविक व स्वागत  तर नवनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अभियंता दशरथ जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सरपंच बाळासाहेब पवार, ग्रा. पं. सदस्य धनाजी जाधव, सुधाकर जाधव, गोविंद जाधव, नितीन जाधव, बाळासाहेब जाधव, शरद जाधव, हरिभाऊ चोरामले, भरत जाधव, संतोष जाधव, भिमराव जाधव, चंद्रकांत जाधव आदींसह विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या पुढेही विद्यार्थ्यांना सहकार्य करू, अशी भावना मुंबईकर मंडळातर्फे करण्यात आली.