|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » डोनाल्ट ट्रम्प यांच्याकडून श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबाबत चुकीचे ट्वीट

डोनाल्ट ट्रम्प यांच्याकडून श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबाबत चुकीचे ट्वीट 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये काल आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 स्फोट हॉटेलमध्ये झाल्याची झाले आहेत. मात्र त्यानंतर आता आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबाबत चुकीचे ट्विट केले होते. श्रीलंकेतील स्फोटात 13 कोटी नागरिक ठार झाल्याचे ट्विट ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांचे हे ट्विट चूकीचे असल्याचे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर तात्काळ हे ट्विट डिलीट करण्यात आले.