|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » अमित शाहंकडून साध्वी प्रज्ञा सिंहची पाठराखण

अमित शाहंकडून साध्वी प्रज्ञा सिंहची पाठराखण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही भोपाळच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांची पाठराखण केली आहे. जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात येत आहे. साध्वी प्रज्ञा यांच्यावर आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे त्यांना खोटय़ा गुह्यात अडकविण्यात आले होते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

सोमवारी कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत शाह बोलत होते. शाह म्हणाले, न्यायालयात साध्वी यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यांना या प्रकरणात हिंदुत्त्ववादाच्या नावावर गोवण्यात आले होते. स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल्समझौता एक्सप्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आला करुन आरोपी बनवण्यात आले आहे. तसेच सध्या बंगालमध्ये पोलीस आणि बाबूशाहीच राज्य चालवत आहे. औद्योगिक विकासाचा आलेख खाली घसरत असून, बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.