|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » सरकारने जेटचा ताबा घेऊन कर्मचाऱयांच्या नोकऱया वाचवाव्यात

सरकारने जेटचा ताबा घेऊन कर्मचाऱयांच्या नोकऱया वाचवाव्यात 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

आर्थिक अडचणीत आलेल्या जेट एअरवेजचा ताबा घेऊन सरकारने कर्मचाऱयांच्या नोकऱया वाचवाव्यात, असे शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. उद्धव म्हणाले, जेटच्या कर्मचाऱयांच्या नोकऱया सरकारने वाचवाव्यात. त्यांच्या कुटुंबीयांचे शाप घेऊ नका. श्रम करणाऱयांचे रिकामे हात आणि उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव यांनी आपली भूमिका मांडली आहे.