|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मतदानासाठी सिडनीतून उद्योजक श्रीगोंद्यात

मतदानासाठी सिडनीतून उद्योजक श्रीगोंद्यात 

ऑनलाईन टीम / नगर :

ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये उद्योजक असणारे विजय सप्रे मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी श्रीगोंद्याला आले आहेत. सिडनी ते मुंबई या प्रवासासाठी सप्रे यांना 1 हजार 600 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे 80 हजार रुपये त्यांना खर्च आला आहे.

सप्रे यांचा सिडनी येथे टेलिकॉमचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर 2011 ते 2014 दरम्यान ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे व्होडाफोन नेटवर्कचे फिल्ड इंजिनीअर म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया सप्रे यांनी पुणे जिह्यातील शिरूर तालुक्मयातील रांजणगांव एमआयडीसीमध्ये डिस्टील वॉटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली आहे. पत्नी शुभांगी यांच्याकडे रांजणगावमधील उद्योगाचा कार्यभार सोपवून मार्च 2018 पासून त्यांनी सिडनी येथे टेलिकॉमचा व्यवसाय सुरू केला आहे. श्रीगोंदा येथे त्यांचे वडील नामदेव, आई सुभद्रा शेती करतात. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते श्रीगोंद्याला आले आहेत.